आठवतंय

Posted in Uncategorized on मार्च 29, 2016 by कुणाल चांदेगावकर

pratiksha

Advertisements

महाराष्ट्रात नाशिकमध्येच का भरतो कुंभमेळा?

Posted in मराठी on जुलै 14, 2015 by कुणाल चांदेगावकर

नाशिकच्या कुंभाचा इतिहास काय आहे. तो नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा दोन ठिकाणी का आयोजित केला जातो? उत्सुकता म्हणून असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच… तर त्याचंच हे उत्तर…

KumbhMela

KumbhMela

नाशिक आणि त्रंबकेश्वरमध्ये आजपासून पुरोहित संघाच्या ध्वजारोहाणाने सुरुवात झालीय. भारतात अलाहाबाद, हरिद्वार, उज्जेन आणि नाशिक या चारच ठिकाणी कुंभमेळा भरतो.

सिंह राशीत जेव्हा गुरुचे आगमन होते त्यावेळी नाशिकमध्ये हा कुंभमेळा भरतो… ग्रहांची ही स्थिती दर बारा वर्षांनी येते. या कुंभाची रंजक अशी पौराणिक कथा सांगितली जाते. देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्र मंथन सुरु असताना दानव आक्रमक झाले. त्यावेळी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण करून राहूच्या हातातून अमृत कलश हिसकावून घेतला आणि इंद्राचा मुलगा जयंत याच्याकडे सोपविला. तो कलश घेऊन जयंत स्वर्गाच्या दिशेने जात असताना त्याने हरिद्वार, उज्जेन, अलाहाबाद, नाशिक अशा चार ठिकाणी तो कलश ठेवला असता अमृताचे काही थेंब खाली पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यावेळी जी ग्रहस्थिती होती तशी ग्रहस्थिती दर बारा वर्षांनी येते आणि त्यावेळी त्या-त्या ठिकाणी कुंभमेळा भरला जातो

कुंभमेळा जसा अनादिकालापासून भरतो तसेच त्यावरुन होणारे वादही तेवढेच प्राचीन आहेत. १७६० मध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यात शैव आणि वैष्णव या दोन पंथांच्या साधुंमध्ये झालेल्या वादातून मोठ्या प्रमाणात संहार झाला. या  संघर्षात सोळाशेहून अधिक साधूंना आपले प्राण गमवावे लागलेत. साधूंचा हा वाद पेशव्यांच्या दरबारात गेला. पेशव्यांनी १७७२ मध्ये वादाचा निवाडा करत त्रंबकेश्वरला शैव पंथीय तर नाशिकमध्ये भगवान विष्णूला पंथीयांनी स्नान करावे, असा आदेश दिला तेव्हा पासून आजपर्यंत त्यांचा आदेशाच पालन केलं जातंय.

कुंभमेळाच्या मुख्य स्थानापासून १८ मैल अंतरावर जेवढे तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते, अशी श्रद्धा असल्याने नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी कुंभपर्व काळात पर्वणीच्या दिवशी शाही स्नान केले जाते.

नातं

Posted in मराठी on डिसेंबर 18, 2014 by कुणाल चांदेगावकर

गरज म्हणून ‘नातं ‘ कधी जोडू नका
सोय म्हणून सहज असं तोडू नका
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू
नका..
भावनांचं मोल जाणा , मोठेपणात हरवू
नका..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं
नातं जुळत असतं,
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं,
तुम्ही फक्त ओंजळ पुढे करुन पहा,
कमीपणा मानू नका, व्यवहारातलं
देणं घेणं फक्तं मध्ये आणू नका..
मिळेल तितकं घेत रहा,
जमेल तितकं देत रहा,
समाधानात तडजोड असते फक्त
जरा समजून घ्या
‘नातं ‘ म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घ्या..
विश्वासाचे चार शब्दं ..
दुसरं काही देऊ नका
जाणीवपूर्वक ‘नातं ‘ जपा..
मध्येच माघार घेऊ नका…

कार्तिक एकादशी

Posted in मराठी on नोव्हेंबर 28, 2014 by कुणाल चांदेगावकर
Pndurang

जाता पंढरीशी ………

चंद्रभागा
———
श्रीक्षेत्र पंढरपूर हे भिमा नदीच्या तीरावर आहे. भीमा नदिला भिवरादेखील म्हणतात, ही नदी इथे अर्धचंद्राकार वाहते म्हणून तिला चंद्रभागा हे नांव आहे.
याविषयी अख्यायिका सांगितली जाते की, शापित चंद्राने इथे येवून या तीर्थात स्नान केले व तो शापमुक्त झाला म्हणूनच ही नदी अर्धचंद्राकार वाहू लागली व लोक तिला चंद्रभागा म्हणू लागले. काही संशोधकाचे मते भागवताच्या स्कंद ५ अध्याय १९ मधील १८ व्या श्लोकात हिंदुस्थानातील महान नद्यांचे वर्णन करताना भागीरथी व चंद्रभागा या नद्यांचे अस्तित्व दाखविलेले आहे. तसेच महाभारताच्या भीष्मपर्वात अध्याय ९ मध्ये देखील चंद्रभागा नदीचा उल्लेख केलेला आढऴतो. आनंद रामायणातदेखील भीमा नदीचा उल्लेख आढळतो. प्रभु रामचंद्रांनी सीताशोधार्थ लंकेला जाताना या तीर्थक्षेत्राला भेट दिल्याचा प्रसंग वर्णिला आहे.

धन्य धन्य भिवरातट | चंद्रभागा वाहे निकट |
धन्य धन्य वाळुवंट | मुक्तिपेठ पंढरी |

असे चंद्रभागेचे महत्व सांगितले आहे.
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान | आणिक दर्शन विठोबाचे ||
उभे राहुनि दर्शन मंडपी | कृतार्थ करील जगजेठी ||
ज्या वाळवंटी सकल संताची मांदियाळी कीर्तनरंगी नाचत, नामघोषात मग्न होवून कृतार्थ झाली, त्या वाळवंटात नाचत जयघोष करावा आणि ज्या चंद्रभागेच्या पवित्र स्नानाने संतासह लाखो भाविक, भक्त पापमुक्त झाले, धन्य झाले त्या तीर्थात स्नान करण्याची, पावन होण्याची उत्कट इच्छा भक्तजनाच्या मनी निर्माण होते.कोटी कोटी जन्माचे पातक | नासे केलेया देख ||
एवढे क्षेत्र अलौकिक | पांडुरंग भीवरा ||

अशी या तीर्थस्नानाची ख्याती आहे.
भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात. ज्या भक्तराज पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी परब्रह्म परमात्मा पांडुरंग आला आणि त्याच्या प्रार्थनेनुसार त्याने दिलेल्या विटेवर युगे अठ्ठावीस भक्तांना दर्शन देऊन कृतार्थ करण्यासाठी भीमातीरी उभा राहिला आहे, त्या पुंडलिकाचे दर्शन घेतात. चंद्रभागेच्या वाळवंटात अन्य संत मंडळीची समाधी स्थाने आहेत. नदीचे पात्र विशाल, अर्धचंद्राकार व देखणे आहे.

पुंडलिक मंदिर
——————
भक्त पुंडलिकाचे मंदिर चंद्रभागेच्या पात्रात, महाद्वार घाटासमोर आहे. हे मंदिर चांगदेवाने बांधले आहे. मदिरामध्ये मोठा सभामंडप असुन आतिल बाजूस गाभारा आहे. गाभर्‍यातील शिवलिंगावर पुंडलिकाचा पितळी मुखवटा आहे. या मुखवट्यावर टोप घालून नाममुद्रा लावुन पुजा केली जाते.तसेच पहाटेपासुन रात्रीपर्यंत पुंडलिकाचे नित्योपचार,काकड आरती, महापूजा, महानेवैद्य,धुपारती इत्यादी करतात. महाशिवरात्रीला या ठिकाणीमोठा उत्सव असतो. चंद्रभागानदीला पूर आल्यावर पुंडलिकाचा चलमुखवटा उद्धव घाटावरील महादेव मंदिरात ठेऊन तिथे पुजा व नित्योपचार केले जातात.

लोहदंड तीर्थ
लोहदंड तीर्थ चंद्रभागेच्या पात्रात पुंडलिकाच्या मंदिरासमोर आहे. विशेष म्हणजे इथे दगडी नाव तरंगते असे म्हणतात. या तीर्थात स्नान केल्याने इंद्राच्या अंगावरील सहस्त्र छिद्रे गेली आणि इंद्राच्या हातातील लोहदंड या तीर्थात तरंगला अशी आख्यायिका आहे.

लखुबाई मंदिर
दगडी पुलाजवळ दिंडीरवनात हे मंदिर आहे. भगवान श्रीकॄष्ण जेंव्हा द्वारकेहून श्रीरुक्मिणीला शोधण्यास दिंडीरवनात आले तेंव्हा त्यांची आणि रुक्मिणीची भेट या वनात झाली.रुक्मिणी देवीचे तप करण्याचे स्थान हेच लखुबाईचे मंदिर होय.पुर्वी या मंदिराभोवती पुष्कळ झाडी होती.
हे मंदिर पुर्णपणे दगडी बांधकाम केलेले असुन हेमाडपंथी पद्धतीचे आहे या मंदिरात दसरा आणि नवरात्र हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.

नामदेव पायरी
—————–
अशी आख्यायिका सांगतात की संत नामदेवांनी श्री पांडुरंगाला सांगितले की, ” हे भगवंता! मला तुमचे वैकुंठपद नको त्यापेक्षा इथे येणार्‍या सर्व भक्तांच्या पायधुळ मला लागेल अशी जागा द्या”. असे म्हणुन संत नामदेवांनी मंदिराच्या पायरीकडे बघितले तर ती भुमी एकदम दुभंगली. या वेळी भगवंत पांडुरंग संत नामदेवास म्हणाले की, ” हे नामा,तुला ही भुमी दिली. माझ्या दर्शनास येणार्‍या भक्तमंडळीची पायधुळ तुला लाभेल.” नंतर पांडुरंगास नामदेवांनी नमस्कार केला आणि त्या दुभंगलेल्या भुमीमध्ये उडी टाकली.त्याचवेळी तिथे असलेल्या संत नामदेवांच्या मंडळींनी उड्या घेतल्या. सर्व लोक बघत असतानाच भुमी एकदम पहिल्याप्रमाणे झाली.
ही घटना शके १२३८ आषाढ वद्य त्रयोदशीस झाली. संत नामदेवांसह त्यांच्या परिवारातील ज्या १४ जणांनी उड्या घेतल्या त्यात त्यांची आई गोणाई,वडिल दामाशेटी,पत्नी राजाई,चार पुत्र श्रीनारायण,श्रीविठ्ठल,श्रीगोविंद,श्रीमहादेव तसेच तिघी सुना गोडाई,येसाई,मखराई,मुलगी लिंबाई, बहिण आऊबाई,संत नामदेवांच्या दासी आणि शिष्या संत जनाबाई यांचा समावेश होता. या ठिकाणी पुजेकरीता सर्व लोकांनी पायरी केली आहे या पायरीस संत नामदेव पायरी असे म्हणतात.

गोपाळपूर
————
गोपाळपूर या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे मंदिर असुन हे मंदिर पंढरपूरापासुन दक्षिण-पुर्व दिशेस दीड किमी अंतरावर आहे. हे मंदिर एका टेकडीवर आहे या टेकडीस गोपाळपूर पर्वत म्हणुन संबोधतात. हा पर्वत म्हणजेच गोवर्धन पर्वत आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे.
स्कंद पुराणातील ‘पांडुरंग माहात्म्याच्या’ दुसर्‍या अध्यायात सांगितलेल्या कथेनुसार – श्रीकृष्ण पंढपूरास जाण्यास निघालेले पाहून गोवर्धनही निघाले.कदाचित भगवान श्रीकृष्ण रागावतील म्हणुन ते इथे दुसर्‍या रुपात आले. त्यांनी चंद्रभागा आणि पुष्पावती नदीच्या संगमावरील गोपाळपूर गावाला माथ्यावर धारण केले आणि तेथेच राहिले.
गोपाळपूर मंदिराच्या पायथ्याशी यशोदेच्या दही मंथनाची प्रतिकात्मक जागा आहे. पुर्वेस लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे.मंदिरास खाली पायथ्यापासून दगडी पायर्‍या आहेत. मंदिरात अनेक खोल्या असुन तीन बाजूंनी दर्शन दरवाजे आहेत.मुख्य दरवाजा आकर्षक आणि भव्य आहे.
मंदिराच्या गाभार्‍यात गोपाळकृष्णाची वेणू वाजवणारी अत्यंत सुंदर आणि आकर्षक मुर्ती आहे. गोपाळकॄष्णाच्या दोन्ही बाजुला पंखा घेऊन उभ्या असलेल्या गौळणी असुन खाली गाय आणि बछड्यांच्या मुर्ती आहेत.

विष्णुपद
————

भगवान श्रीकृष्ण श्रीक्षेत्री येताना गायी, गोपासह येवून प्रथम गोपाळपूर येथे थांबले होते. त्यावेळी त्यांचे पायाचे,गायीच्या खुरांच्या खुणा दगडावर उमटलेल्या असून सध्या त्याठिकाणास विष्णुपद म्हणतात. त्याचेच समोर देवर्षी नारदाचे मंदिर आहे.मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर या विष्णुपदावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. श्रीभगवान श्रीकृष्ण श्रीक्षेत्रात प्रथम येथे आले व ते मार्गशीर्ष महिन्यात होते त्यांचे वास्तव्य होते म्हणून त्या ठिकाणी दर्शनासाठी भाविक जातात, असे म्हटले जाते. त्या एक महिन्याचे काळात याठिकाणी दररोज अभिषेक पूजाविधी केले जातात.भगवान श्रीकृष्ण श्रीक्षेत्री येताना गायी, गोपासह येवून प्रथम गोपाळपूर येथे थांबले होते. त्यावेळी त्यांचे पायाचे,गायीच्या खुरांच्या खुणा दगडावर उमटलेल्या असून सध्या त्याठिकाणास विष्णुपद म्हणतात. त्याचेच समोर देवर्षी नारदाचे मंदिर आहे.मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर या विष्णुपदावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. श्रीभगवान श्रीकृष्ण श्रीक्षेत्रात प्रथम येथे आले व ते मार्गशीर्ष महिन्यात होते त्यांचे वास्तव्य होते म्हणून त्या ठिकाणी दर्शनासाठी भाविक जातात, असे म्हटले जाते. त्या एक महिन्याचे काळात याठिकाणी दररोज अभिषेक पूजाविधी केले जातात.

बाबा रिटायर होतोय

Posted in मराठी on जुलै 15, 2013 by कुणाल चांदेगावकर

आज माझंच मला कळून चुकलं,
मलाच नातं नीट जपता नाही आलं.

आज जेवून झाल्यावर बाबा बोलला, “मी आता रिटायर होतोय, मला आता नवीन कपडे नको, जे असेल ते मी जेवीन, जे असेल ते मी खाईन, जसा ठेवाल तसा राहीन.”

काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं, आणि टचकन पाणी डोळ्यात यावं, काळीजच तुटावं, अगदी तसं झालं.
एवढंच कळलं कि आजवर जे जपलं ते सारंच फसलं.

का बाबाला वाटलं तो ओझं होईल माझ्यावर ?
मला त्रास होईल जर तो गेला नाही कामावर ?
तो घरात राहिला म्हणून कोणी ऐतखाऊ म्हणेल,
कि त्याची घरातली किंमत शून्य बनेल.
आज का त्याने दम दिला नाही, “काय हवं ते करा माझी तब्बेत बरी नाही, मला कामावर जायला जमणार नाही.”

खरंतर हा अधिकार आहे त्याचा सांगण्याचा, पण तो काकुळतीला का आला?
ह्या विचारातच माझं मनं खचलं.

नंतर माझं उत्तर मला मिळालं,
जसा जसा मी मोठा होत गेलो,
बाबाच्या कवेत मावेनासा झालो.
नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं,
त्याबरोबर वाढत होता तो अहंकार, आणि त्याने वाढत होता तो विसंवाद,
आई जवळची वाटत होती, पण बाबाशी दुरावा साठत होता.
मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं, पण ते शब्दात सांगताच आलं नाही,
बाबानेही ते दाखवलं असेल, पण दिसण्यात आलं नाही.
मला लहानाचा मोठा करणारा बाबा, स्वःताच स्वतःला लहान समजत होता.
मला ओरडणारा – शिकवणारा बाबा, का कुणास ठाऊक बोलताना धजत होता.

मनाने कष्ट करायला तयार असलेल्या बाबाला, शरीर साथ देत नव्हतं, हे त्या शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला, घरात नुसतं बसू देत नव्हतं. हे मी नेमकं ओळखलं.

खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून, सांगायचच होतं त्याला कि थकलायेस आराम कर, पण आपला अधिकार नव्हे सूर्याला सांगायचा कि “मावळ आता”.

लहानपणीचे हट्ट पुरवणारा बाबा,
मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारा बाबा,
आणि नंतर चांगलं वागण्यासाठी कानउघडणी करणारा बाबा,
आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता,
जेव्हा खुर्चीत शांत बसतो, तेव्हा वाटतं कि काही जणू आभाळंच खाली झुकलं.

आज माझंच मला कळून चुकलं.

मन आज म्हणतय पुन्हा वेडं होऊन बघ

Posted in मराठी कविता on मार्च 14, 2013 by कुणाल चांदेगावकर

64110_239749466153958_1172670132_n

का कुणास ठावुक? मन आज म्हणतय पुन्हा वेडं होऊन बघ,

ती जुनी पायवाट पुन्हा एकदा चालून बघ.

तो तिथेच उभा असेल, तुझी वाट बघत…

या वेळी तरी ते वळण चुकवू नकोस,

निराश होऊन पावले तुझी परत फ़िरवू नकोस.

जरा वेळ दे स्वत:ला, त्याला शोधण्यासाठी,

जरा वेळ दे त्याला, तुला भेटण्यासाठी!

स्वत:शी एवढी निश्ठुर हो ऊ नकोस,

त्याच्या खांद्यावर पुन्हा एकदा विसावून बघ,

ह्या वेड्या पावसात जरा प्रेम करुन बघ !

मन आज म्हणतय पुन्हा वेडं होऊन बघ !

माझ्यावर खुप खुप प्रेम करते

Posted in मराठी कविता on फेब्रुवारी 26, 2013 by कुणाल चांदेगावकर

Ti

कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती…
एरवी अगदी खळखळून हसते
पण मी हात पकडला की गोड लाजते
जीन्स टी शर्ट regularly घालते
पण पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते
साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते
पण मोबाइल मधे फोटो काढतो म्हणालो तर ‘नाही’ म्हणते
पिज्जा बर्गर सर्रास खाते
चहा मात्र बशीत ओतुनच पिते
लोकांसमोर खुप बोलते
मला i luv u म्हणताना मात्र फक्त same 2 u च म्हणते
ग्रुपमधे असताना खुप बिनधास्त असते
पण माझा विषय निघाला की पटकन बावरते
बोलून दाखवत नसली तरी नजरेने खुप काही सांगते
एवढ नक्की सांगतो माझ्यावर खुप खुप प्रेम करते